मोशीत १००फूट उंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजाचा पुतळा उभारण्यात येणार
जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. राम सुतार करीत आहेत


पिंपरी, ३० ॲागस्ट २०२४ – मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रातील पीएमआरडीएने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेल्या से.क्र. ५ व ८ मधील जागेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सद्यस्थितीत चबुत-याचे काम चालू आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या १००फूट उंच ब्रॉझ मधील पुतळ्याचे काम जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. राम सुतार करीत असून दिल्ली येथील फाउंड्री येथे पुतळ्याची निर्मिती करण्यात येत आहे. सदर पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझाईन आयआयटी मुंबई यांचे मंजूर संरचनेनुसार करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सदर पुतळ्याचे काही भाग दिल्ली येथून पिंपरी चिंचवड येथे ट्रकने वाहतूक करून मोशी येथे आणण्यात आले आहेत. प्रत्यक्ष पुतळा उभा करणे पूर्वी, पुतळ्यासाठी ब्रॉझ धातूने सांधे जोडणी व इतर आवश्यक प्रक्रिया प्रत्यक्ष जागेवर केल्यानंतर प्रत्यक्षात पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. या कामावरही आयआयटी मुंबई येथील तज्ञांची देखरेख राहणार आहे. सदर कामात त्रुटी असल्याचे दाखवून, सदर पुतळ्याचे एका भागाचे काही व्यक्ती फोटो व्हायरल करीत आहेत.

तथापि सदर कामातील पुतळ्याची उभारणी ही अद्यापही चालू नसल्याने या बाबींमध्ये अजिबात तथ्य नाही.त्यामुळे नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.