प्रख्यात अभिनेता विजय कदम मनोरंजन क्षेत्रात विनोद वीर हरपला
विजय कदम यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला


मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांचं निधन झालंय. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत कार्यरत होते. कॅन्सरची झुंज अपयशी झाल्याने विजय कदम यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. अंधेरी येथील स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांच्या निधनाने हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात दाटून आल्या आहेत.

मराठी रंगभूमीला व चित्रपट सृष्टीला आपल्या सहजसुंदर अभिनयाने समृध्द करणारे अभिनेते स्व. विजयजी कदम यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे.
रंगभूमीवरचा त्यांचा सहज वावर, प्रत्येक भूमिकेला पूर्ण न्याय देण्याची भावना व आपल्या कलेप्रती असलेली श्रद्धा ही विजयजी कदम यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो व हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली!