ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या वतीने पॅरिस ऑलिंपिक २०२४ प्रदर्शन
प्रदर्शनाचा मुख्य उद्देश हा ऑलिंपिक स्पर्धांची माहिती, त्यांचा इतिहास, क्रीडा विज्ञान, भारताचे ऑलिम्पिक मधील स्थान



पिंपरी २९जुलै :ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या वतीने पॅरिस ऑलिंपिक २०२४ च्या

निमित्ताने ऑलिंपिकचा प्रवास सांगणारे एक विशेष प्रदर्शन ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयातील क्रीडाकुल या विभागाने भरवले आहे. प्रदर्शनाचा मुख्य उद्देश हा ऑलिंपिक स्पर्धांची माहिती, त्यांचा इतिहास, क्रीडा विज्ञान, भारताचे ऑलिम्पिक मधील स्थान याबरोबरीनेच खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा अशा सर्वांचे एकत्रित प्रदर्शन तक्त्यांच्या रूपाने मांडले आहे.
२९ जुलै २०२४ सोमवार रोजी या प्रदर्शनाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कै. हेमंत जोगदेव यांचे सुपुत्र वसंत जोगदेव ही उपस्थित होते. तसेच पंकज पाटील उपायुक्त क्रीडा अधिकारी, ऑलम्पिक पटू मारुती आडकर आणि बाळकृष्ण आकोटकर हे देखील उपस्थित होते. कै. हेमंत जोगदेव यांनी क्रीडा जगतासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हे प्रदर्श़न त्यांना समर्पित केले गेले.
यावेळी क्रीडाकुलचा माजी विद्यार्थी आणि मेक्सिको येथे होणाऱ्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत निवड झालेला कु. प्रथमेश फुगे याचा सत्कार मा. प्रदीप जांभळे पाटील यांनी केला.
मा. पंकज पाटील यांनी सर्व क्रीडाकुल टीमचे अभिनंदन करून प्रदर्शनासाठी घेतलेले परिश्रम, संकलित केलेली माहिती, ऑलिम्पिक प्रदर्शनाद्वारे सर्वांसाठी खुला केलेला इतिहास, त्यातील क्रीडाप्रकार, खेळाडू घडण ही सर्व माहिती अभ्यासपूर्ण असून सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले करावे, तसेच क्रीडाविषयक धोरण, प्रत्येक खेळाची महिती, अकॅडमीमधील खेळाडू विद्यार्थी या सगळ्यांपर्यंत हे प्रदर्शन पोहचवावे अशी विनंती केली.
मा. प्रदीप जांभळे पाटील यांनी मी ज्ञान प्रबोधिनीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे अशी सुरुवात करत क्रीडाकुलने मांडलेल्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला. यानिमित्ताने त्यांनी ऑलम्पिकच्या इतिहासात हेलसिंकीपासून सुरु झालेल्या भारतीय खेळाडूंची पदक संख्या कशी वाढत गेली अशी मांडणी केली. तसेच महानगरपालिकेने दिलेल्या क्रीडा सुविधांचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे असेही आवाहन या निमित्ताने त्यांनी केले.
ज्ञान प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर यांनी या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशी विविध प्रकारची प्रदर्शने भरवावीत. त्यातून ऑलिंपिकची चळवळ गावोगावी पोहोचवावी असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले जिथे माणूस मनाने, बुद्धीने, सर्व अंगाने विकसित होतो तोच खरा देश. आणि यासाठी क्रीडा मैदानावर पराक्रम दाखवणे हेच गरजेचे आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. मंजुषा ताई पुरोहित यांनी केले तर आलेल्या पाहुण्यांचा परिचय वैद्य दीप्तीताई धर्माधिकारी यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निखिल सोनोने यांनी केले.